मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत प्रत्येक माध्यमांमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले आहेत. गिरीश ओक यांनी झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत मुख् भूमिकेत दिसले होते. त्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत धमाकेदार एन्ट्री करणार आहेत.
दरम्यान, या मालिकेचे कथानक तब्बल २५ वर्षांनी पुढे गेले असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत गिरीश ओक नित्याच्या वडीलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून पुन्हा एकदा गिरीश ओक यांना मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.