मुंबई : नागरी सहकारी बँकेसमोरील प्रश्नांच्या निराकरणासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.मुळाच राज्यातील नागरी सहकारी बँकाँच्या अडीअडचणीबाबत मंत्रालयात ही बैठक बोलवण्यात आली होती.
या बैठकीला मंत्री दिपक केसरकर, आमदार प्रविण दरेकर,सायली भोईर, विद्याधर अनास्कर, सुभाष पणदूरकर, आनंद कटके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यातील काही बँक अडचणीत असून त्यांना liquidity crar राखण्यासाठी शासनाचे अर्थसाहय्य मिळणे आवश्यक असल्याचे मंत्री दिपक केसरकर आणि आमदार प्रविण दरेकरांनी सांगितले.
तसेच या बैठकीत झालेल्या चर्चांनंतर नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना अध्यक्ष पद देण्यात आले. तसेच सायली भोईर,सी.बी.अडसूळ, नितीन बनकर, आनंद कटके यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.