मुंबई : त्र्यंबकेश्वर मंदिरात २१ नोव्हें. पासून पुढील ७ दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मात्र, २०० रु. देणगी दर्शन बारी सुरू राहणार आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रस्तरावरून, राज्यस्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचारासंबंधी प्राप्त होणाऱ्या पत्रांना यातून वगळण्यात आले असून, त्यांना दर्शन मिळणार आहे.
पत्रात म्हटले आहे की, नाशिकमध्ये दि. २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पं. प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, या काळात शासकीय सुट्याही आहेत. दि. २६ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा रथोत्सव आहे. या कालावधीत मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता, प्रशासनावर येणारा ताण, निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करता २१ ते २७ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.