मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात (एसएससी) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता लवकरच अर्ज मागविण्यात येत असून दि. २४ नोव्हेंबरपासून अर्जस्वीकृतीस सुरूवात होणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जीडी कॉन्स्टेबल पदांसाठी लवकरच मोठी भरती केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून तब्बल ७५७६८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
दि. २४ नोव्हेंबर २०२३ पासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात केली जाणार असून तर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २८ डिसेंबर २०२३ असणार आहे. या मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, उमेदवारांकडून १०० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहेत. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.