अजितदादा गटातील 'त्या' माणसाला शरद पवारांनी आयोगासमोर उभे केले!

    21-Nov-2023
Total Views |
 
Sharad Pawar
 
 
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवीनी अजित पवार गटाने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे निवडणूक आयोगाला निदर्शनास आणुन दिले. कुंवर प्रतापसिंह हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत व ते शरद पवार गटासोबत आहेत. मात्र, अजितदादा गटाने कुंवर यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
 
कुंवर प्रतापसिंह हे शरद पवारांसोबत सुनावणीला हजर होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते. दरम्यान दि. २० नोव्हेंबर रोजी सुनावणीमध्ये निवडणुक आयोगाने शरद पवार गटाच्या वकिलांची कानउघडणी केली आहे. निवडणुक आयोगाने सांगितले की, प्रत्येक सुनावणीत तेच तेच मुद्दे उपस्थित करू नका. गेल्या सुनावणीत ही बनावट प्रतिज्ञापत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ह्यावेळी ही तोच मुद्दा उपस्थित केल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.
 
सिंघवी म्हणाले की, "२६ ॲाक्टोबर रोजी अजित पवार गटाने एका पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. पण ते बनावट असल्याचे आम्ही आयोगाच्या नजरेस पुराव्यासह आणून दिले आहे. त्यांच्या बनावट कागदपत्रांची २४ गटांत वर्गवारी केली आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या त्यांच्या कथित कार्यकर्त्यांपैकी काही जण त्या शहरातच राहत नाहीत. काही विमा एजंट आहेत. काही मृतांच्या नावेही प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. अजित पवार गटाने हे अतिशय लाजिरवाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे." असे सिंघवी यांनी सांगितले.