जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार! मदरशातील मौलवी अखेर जेरबंद

    21-Nov-2023
Total Views |

Maulavi


लखनौ :
उत्तर प्रदेशातून बलात्काराची एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशातील मौलवीनेच तब्बल ३ वर्षे अल्पवयीन मुलावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरमधील खतौली पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे. रविवार १९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून पीडित मुलगा १८ वर्षांचा आहे. येथील मदरशात आजूबाजूच्या परिसरातील अनेक मुले धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. मुझफ्फरनगरमधील सद्दिक नगर परिसरातील रहिवासी असलेला मौलवी इजरायल या मुलांना शिक्षण देत होता.
 
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी पीडित मुलाने स्वत: मौलवी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती त्याने तक्रारीत दिली आहे. पीडित विद्यार्थ्याने तक्रारीत सांगितले की, तो ३ वर्षांपूर्वी मदरशात शिकण्यासाठी गेला होता. सुरुवातीपासूनच मौलवी इस्रायलने त्याच्यावर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्याने मुलाला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याच्यावर बलात्कार केला.
 
पीडित विद्यार्थ्याने मौलवीला विरोध केला असता त्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि मौलवी ने आपला अत्याचार सुरुच ठेवला. आरोपी मौलवीने पीडित विद्यार्थ्याचा अश्लील व्हिडिओही बनवला होता. हा व्हिडिओ दाखवून तो त्याला ब्लॅकमेल करत होता.
 
दरम्यान, रविवारी पुन्हा एकदा मौलवी ने पीडित मुलाला बोलावून त्याच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने स्वत: जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मौलवी वर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मदरशातील इतर विद्यार्थ्यांसोबतही मौलवी अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.