मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांकरिता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळांतर्गत होणाऱ्या थेट मुलाखतीसाठी दि. २२ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य), कनिष्ठ अभियंता(विद्युत), लेखाधिकारी, सहायक विपणन अधिकारी, वास्तुविशारद, आरेखक, लिपिक टंकलेखक, शिपाई या पदांच्या प्रत्येकी १ रिक्त जागा तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्यांच्या भरण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता, ३ रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई २१, या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या थेट भरतीकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.