मुंबई : इंडिया पोर्ट्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून इंडिया पोर्ट्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोर्ट्स लिमिटेडमधील व्यवस्थापक, उप-व्यवस्थापक या पदांकरिता तांत्रिक, एचआर आणि व्यवस्थापन या विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
इंडिया पोर्ट्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दि. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे ५० वर्ष वयोमर्यादेच्या पदवीधरांनादेखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. इंडिया पोर्ट्स मधील भरतीविषयक अधिक तपशील पाहण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून व्यवस्थापक पदासाठी, उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी तर उपव्यवस्थापक पदासाठी एचआर स्ट्रीममधून पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, तत्सम कार्यसंबंधित ४ ते ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.