धनगर आरक्षणाची जालन्यात ठिणगी! आंदोलक आक्रमक

21 Nov 2023 16:50:40
 
Gopichand Padalkar
 
 
मुंबई : धनगर आरक्षणाची जालन्यात ठिणगी पडली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण लागलं. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी मोर्चा आक्रमक झाला होता. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
पडळकर म्हणाले, "सरकारने आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेतले नाही म्हणून धनगर समाज आक्रमक झाला. धनगर समाज आंदोलनाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजवणीची मागणी आहे. आम्ही नव्याने कुठे आरक्षण मागत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वेगळं आरक्षण दिले होते, तशी प्रक्रिया सरकार लवकर सुरू करेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितलं." अशी माहिती पडळकरांनी दिली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0