मुंबई : संस्था शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दि. ०६-०८ डिसेंबर २०२३ रोजी इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट (ISCI), मुंबई, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (ICAC), वॉशिंग्टन डीसी, यूएसए, भाकृअनुप- केन्द्रिय कापुस संशोधन संस्था (ICAR-CICR), नागपूर आणि इंडियन फायबर सोसायटी (IFS), मुंबई च्या संयुक्त विद्यमाने ९वी आशियाई कॉटन रिसर्च अँड डेव्हलपमेंट नेटवर्क (ACRDN) बैठक तसेच “संवेदनक्षम आणि शाश्वत कापूस उत्पादन आणि व्यवहार्य मूल्य साखळीसाठी नवोपक्रम” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करून शताब्दी वर्ष (२०२३-२४) साजरे करण्यास सुरुवात करणार आहे. ह्या कार्यक्रमात जगभरातील नामवंत कापूस संशोधक आणि भागधारक एकत्र येउन कापुस बाजारातील चढउतार आणि पीक कीटक-संबंधित समस्या ते कापुस क्षेत्राच्या शाश्वतीकरणांत उद्भवणाऱ्या आव्हानांवर चर्चा करणार आहेत.
केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) ही १९२४ मध्ये मुंबई मध्ये स्थापित; भारतीय कृषी संशोधन परिषदेची एक प्रमुख घटक संस्था आहे, जी कापूस आणि कृषी-अवशेषांवर प्रक्रिया करुन मुल्यवर्धित उत्पादने आणि कापसाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी लागणारे मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करते. संस्था ISO ९००१:२०१५ प्रमाणित संस्था आहे आणि NABL (ISO १७०२५:२०१५) अंतर्गत कापुस, सूती धागा व कपड़ा परिक्षणासाठी एक मान्यताप्राप्त रेफरल प्रयोगशाळा आहे.भारताचे माननीय उपराष्ट्रपती, जगदीप धनख़ड ६ डिसेंबर २०२३ रोजी (सकाळी ९.३० ते ११.३०) या परिषदेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस आणि इतर प्रमुख मान्यवरांनी देखील या सोहळ्यात उपस्थिती साठी दुजोरा दिला आहे.