मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून मोठा झटका मिळाला आहे. अनिल देशमुखांची मुलगी आणि सुनेविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. २०२१ साली सीबीआयचा अंतर्गत अहवाल लीक झाल्याचे हे प्रकरण आहे. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुखांचे वकील आनंद डागा यांनी कथित लाच दिली होती.
मुलगी पुजा वर डागा यांना मदत केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. २९ ऑग. २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांधून लीक झाला होता. देशमुखांवर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयने चौकशी केली होती. त्याच प्रकरणात क्लीन चिट अहवाल हा लीक झाला होता. त्यामुळे अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पुजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.