अखेर ‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणची पहिली झलक आली समोर...

    21-Nov-2023
Total Views |

ajay devgan 
 
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या कॉप युनिवर्समधील ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे सध्या चित्रिकरण सुरु असून पहिल्यांदाच अभिनेता अजय देवगण याचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. ‘सिंघम’चे पहिले दोन भाग यशस्वी झाल्यानंतर रोहित शेट्टी प्रेक्षकांसाठी तिसरा भाग घेऊन येत आहेत.
 
 
 
'सिंघम अगेन' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटातील कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. याच चित्रपटातील अजय देवगणचा पहिला लूक समोर आला असून अजयने त्याच्या सोशल मिडीयावरुन सिंघम अगेनमधील स्वतःचा पहिला लूक शेअर केला आहे. तर रोहित शेट्टीनेही हे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, 'सिंह दहशत निर्माण करतो आणि जखमी सिंह विनाश करतो. सर्वांचा आवडता पोलीस बाजीराव सिंघम परत आला आहेत. सिंघम अगेन....
 

rohit shetty 
 
‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, करिना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पडूकोण, अक्षय कुमार आणि टायगर अशी तगडी कलाकारांची फौज दिसणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.