‘इफ्फी’त माधुरी दीक्षितचा खास सन्मान!

    20-Nov-2023
Total Views |

mahduri dixit 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्य, अदाकारी आणि अभिनय आणि नृत्यामुळे जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माधुरी दीक्षित हिचा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान केला जाणार आहे. ‘मोहिनी’ तर कधी ‘चंद्रमुखी’ अशा विविध भूमिकांमधून माधुरी दीक्षितने प्रत्येकवेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या भूमिकांना अजरामर केले. आज ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 
केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दल घोषणा केली आहे. ‘५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI) मध्ये माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटविश्वात अद्भुत आणि अविस्मरणीय योगदान दिल्याबद्दल विशेष पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा अनुराग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केली.
 
अनुराग ठाकूर यांनी लिहिले आहे की, “माधुरी दीक्षितने ४ दशकं आपल्या प्रतिभेने आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘निशा’ पासून ते मनमोहक ‘चंद्रमुखी’ पर्यंत, ‘बेगम पारा’पासून ‘रज्जो’ पर्यंत, तिच्या अभिनयातील विवधतेला काहीच मर्यादा नाहीत. आज आम्हाला ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशा प्रतिभावान अभिनेत्रीला ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करताना फार आनंद होत आहे.”
 
 
 
गोव्यामध्ये ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून यंदा मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मधुरा वेलणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.