‘आयुष्याचं सार्थक झालं’, प्रसाद ओकची लेकासाठी भावूक पोस्ट

20 Nov 2023 16:33:01

prasad oak 
 
मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने त्याच्यातील कौशल्यांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले. सध्या कुटुंबीयांसोबत प्रसाद परदेशात असून त्याचे परदेशी जाण्ये कारण देखील खास आहे. प्रसादच्या मुलाचा सार्थकचा पदवीचा समारंभ परदेशात झाला यासाठीच पर्साद, मंजरी आणि मयांक सोबत गेला होता.
 
प्रसादने लेकाचा पदवी घेतानाचा व्हिडीओ शेअर करत लिहीले आहे की, “सार्थकचा “पदवी प्रदान समारंभ”…सार्थक…आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…”
 

prasad 
 
 
 
दरम्यान, लवकरच प्रसाद ओक वडापाव हा नवा चित्रपट भेटीला घेऊन येणार आहे. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला असा 'वडापाव' चित्रपट असणार आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
 
Powered By Sangraha 9.0