'IFFI'मध्ये मराठी चित्रपटाचा डंका! महेश मांजरेकर आणि मधुरा वेलणकर यांच्या 'बटरफ्लाय'चा विशेष शो

    20-Nov-2023
Total Views |

butterfly 
मुंबई : आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अलीकडे इतर भाषिक चित्रपटांच्या साथीने मराठी चित्रपट देखील झळकू लागले आहेत. ५४ व्या 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाला सोमवार दिनांक २० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी महोत्सवात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या 'बटरफ्लाय' या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
 
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निवड करण्यात आली असून एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया बटरफ्लाय या चित्रपटाचा खास शो दाखवणार आहेत. याबद्दल निर्माते अभिजीत साटम यांनी महाएमटीबीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचा विशेष शो होणं हा मराठी चित्रपटांचाच गौरव आहे. मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कला दाखवू शकतो. तेथे लहान-मोठी अशी कलाकृती न पाहता केवळ उत्तम आशय आणि कथेचा विचार करुन त्यांचा सन्मान केला जातो याचा आनंद आहे”.
 
'बटरफ्लाय' चित्रपट 'गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट' महोत्सवात बुधवार दिनांक २२ नोव्हेंबरला दाखवण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष शो मराठी चित्रपटाचा दाखवणे ही बाब अभिमानास्पद आहे. या विशेष स्क्रीनिंगसाठी चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम, चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.