हवाई क्षेत्रात उंच भरारी! भारत बनणार जगातील अग्रगण्य बाजारपेठ!

    20-Nov-2023
Total Views |

AV



अहमदाबाद :
देशांतर्गत विमानवाहतूकीत १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी विमानप्रवाशांच्या नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. खुद्द केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ही माहिती दिली. देशांतर्गत विमान उड्डाण करणाऱ्या प्रवाशांची संख्या रविवारी ४ लाख ५६ हजार ९१० इतकी झाली. शनिवारी हा आकडा ४ लाख ५६ हजार ७४८ इतका होता.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सोशल मीडिया साईट्स एक्सवर याबद्दल माहिती दिली, "कोविड महामारीनंतर भारतातील स्थानिक विमान उड्डाण क्षेत्रातील वाढ लक्षणीयच नव्हे तर जबरदस्त आणि प्रेरणादायी आहे. केंद्र सरकारचा सकारात्मक दृष्टीकोन, प्रगतीशील रणनिती आणि प्रवाशांचा दृढ विश्वास या बळावर दिवसेंदिवस आणखी नव्या उंचीवर आपण पोहोचत आहोत."


रविवारी ४ लाख ५६ हजार ९१० प्रवाशांनी ५ हजार ९५८ विमानांनी देशांतर्गत प्रवास केला. हीच संख्या १९ नोव्हेंबर रोजी ३ लाख ९३ ३९१ प्रवाशांसह ५ हजार ५०६ उड्डाणांपेक्षा जास्त आहे. "त्यामुळे देशाला कुणी जगातील सर्वात मोठी हवाई उड्डाण क्षेत्रातील बाजारपेठ बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.", असे गौरवोद्गार सिंदिया यांनी काढले आहेत.


वर्ल्डकप इफेक्ट!

बारा वर्षांनी भारतात पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकाची उत्सुकता शिगेला होती. अहमदाबादला येणाऱ्या क्रिकेटप्रेमींमुळे विमान तिकीटे फुल्ल झाली होती. क्रिकेटच्या महाकुंभातील अखेरचा मुकाबला पहाण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमींची पावले नरेंद्र मोदी स्टेडिअमकडे वळली होती. याच दिवशी अहमदाबादकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानभाडे पुढील प्रमाणे होते.
नवी दिल्ली - १४,०३६
लखनऊ - १४,३१२
गोवा - ११,९३३
मुंबई - ८०९९
कोलकाता - २०,०६८
(अहमदाबादला जाण्यासाठी एकेरी भाडे)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.