बलात्कारात काही गैर नाही म्हणणाऱ्या काँग्रेसी उमेदवाराला महिलांचा दणका!

    20-Nov-2023
Total Views |

Shanti Dhariwal


जयपूर :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली असून येत्या २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. दरम्यान, कोटा येथील काँग्रेस नेते शांति धारीवाल यांना एक महिला विरोध करत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
 
या व्हिडीओत शांति धारीवाल यांनी एका महिलेला २५ हजार रुपये दिले आहेत. परंतू, ती महिला पैसे घेण्यास नकार देत असल्याचे यात दिसत आहे. यावेळी काहीजण तिला समजवतानाही दिसत आहे. पण ती महिला शांति धारीवाल यांचा सतत विरोध करत आहे.
 

दरम्यान, शांति धारीवाल यांचे बलात्काराला समर्थन देणारे वक्तव्य पुढे आले होते. त्यामुळे आता या महिलेकडून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. पैसै नाही तर न्याय आणि सन्मान हवा असल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान, शांति धारिवाल हे कोट्यातून निवडणूक लढवणार आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.