सुल्झर पंप्स कंपनीतील कामगारांना एक लाखाच्यावर बोनस!

सोन्याचे नाणेही भेट; दिवाळी जल्लोषात साजरी

    20-Nov-2023
Total Views |
Sulzer Pumps Company worker bonus

नवी मुंबई
: सुल्झर पंप्स इंडिया प्रा. ली. या कंपनीतील कामगारांना १ लाखाच्यावर विक्रमी बोनस देण्यात आला आहे. त्याचबरोबर २४ कॅरेटचे सोन्याचे नाणे व उच्च दर्जाची १ किलो ड्रायफ्रुट मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कामगारांनी दिवाळी जल्लोषात साजरी करून सुल्झर पंप्स व्यवस्थापनाचे आभार मानले आणि युनियन कमिटीचे अभिनंदन केले आहे.

'सुल्झर पंप्स इंडिया प्रा. ली' ही एक नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीमध्ये सुल्झर पंप्स एम्प्लॉईस युनियन ही अंतर्गत कामगार संघटना कार्यरत आहे. या युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार व सरचिटणिस संजय आंब्रे आहेत. यांच्या कमिटीने गेल्यावर्षी ९ ऑगस्ट २०२२ रोजी कामगारांच्या पगारवाढीचा (२८००० रुपये) व बोनसचा त्रैवार्षिक करार केला होता. त्या अनुषंगाने सुल्झरच्या कामगारांना दिवाळीच्या अगोदरच बोनस दिला गेला. २०२२ सालचा या वर्षी दिल्या गेलेल्या बोनसची रक्कम कमाल १,२०,००० रुपये आहे व सरासरी बोनस एक लाखाहून अधिक आहे. कोरोनाच्या महासंकटातून सावरत-सावरत कंपनी सर्व संकटांना सामोरे जात भक्कमपणे चालू राहिली. युक्रेन आणि रशियन युद्धामुळे कंपनीच्या पंपाच्या मागणीत घट झाली होती आणि होत्या त्या काही मागण्याही रद्द झाल्या होत्या. अशा परिस्थितही कंपनीने कामगारांचा पगार वेळच्यावेळी देऊन बोनसही दिवाळीच्या अगोदर दिला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.