महाराष्ट्राच्या राजकारणातील बुकी म्हणजे संजय राऊत : नितेश राणे

20 Nov 2023 14:24:50
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : ज्याने आयुष्यात क्रिकेटची बॅट उचलली नाही ते खासदार संजय राऊत क्रिकेट विषयी आणि स्टेडियमवर बोलत आहे. खरतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बुकी म्हणजे संजय राऊत आहे. बुकीसारखे राजकारणात फिक्सिंग करणे हे त्यांचे काम आहे. अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीका केली होती. याला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
 
नितेश राणे म्हणाले, " सतत भाजपवर बोलणे ही राऊत यांना सवय झाली आहे. राऊत यांना बोलण्याचा पगार १० जनपथवर दिला जातो. मालकाला खुश करण्यासाठी राऊत सतत बडबडतात. गुजराती लोकांचा इतकाच द्वेष असेल तर तुझ्या मालकाला सांग आधी गुजराती माणसांशी संबंध ठेवू नकोस. तुझ्या मालकाच्या बांधलेल्या मॉलमध्ये गुजराती लोक असतात. मोदी स्टेडियममध्ये सामन्याचे उत्तमरित्या नियोजन केले. तुम्हाला वर्ल्ड कपच्या मिरच्या का झोंबतात? आपल्या भारतात पॅलेस्टाइनचे समर्थन इंडिया अलयांस करते. विराटला ग्राउंडमध्ये भेटायला आलेला पॅलेस्टाईनचा समर्थक आला होता. स्पर्धेतील अंतिम सामन्यात गालबोट लावण्यासाठी तो आला होता. पॅलेस्टाइनच्या व्यक्तीचा काँग्रेस खासदार राहूल गांधी यांचा संबंध आहे का? याची चौकशी झाली पाहिजे." असा प्रहार राणेंनी राऊतांवर केला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0