कल्याण : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यसरकारच्या कारभारावर टीका टिप्पणी केली होती. या टिकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमोल कोल्हे यांनी टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या मतदार संघात येणारी निवडणूक कशी जिंकणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे. टीका टिप्पणी करणा:यांना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीने त्यांचं स्थान दाखवून दिले असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यसरकारच्या कारभाराची अवस्था बैलगाडा शर्यतीसारखी झाल्याची टीका केली होती. या टिकेला खासदार डॉ. शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.डॉ. शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतक:यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले. महायुती सरकारच्या काळात शेतक:यांना साडेबारा हजार कोटींची मदत देण्यात आली. महायुतीचे सरकार शेतक:यांसोबत उभे आहे. टीका टिप्पणी करण्यापेक्षा अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदार संघात येणारी निवडणूक कशी जिंकणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे. टीका टिप्पणी करणा:यांना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत त्यांचे स्थान दाखवून दिले आहे. या निवडणूकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. येणा:या काळात भरपूर काम करा, टीका टिप्पणी करायला संपूर्ण आयुष्य पडले आहे. येत्या निवडणूकीत आपआपल्या स्थान कसे काय पक्क ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला ही त्यांनी कोल्हेना दिला.