मुंबई : अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नव्हते. अशी माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.
अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचाऱ्यांकडून मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.