संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसली : देवेंद्र फडणवीस

    20-Nov-2023
Total Views |
 
Fadnavis
 
 
मुंबई : संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट करत कसिनो खेळत असल्याची टीका केली होती. याला देवेंद्र फडणवीस चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. बावनकुळे यांनी जिथे जेवण केलं तिथे रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केलाय. पूर्ण फोटो ट्विट केला त्यात स्पष्टपणे लक्षात येतंय, बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी, नातू, त्यांचा परिवार आहे, सर्वजण त्यामध्ये दिसत आहेत. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्टेशन योग्य नाही."
 
"यापेक्षा आणखी काय वाईट परिस्थिती असू शकते? तुम्ही मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, म्हणजे ही राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखंच आहे." असं फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.