मुंबई : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताच्या हातून विश्वचषक निसटल्यामुळे देशभरातील भारतीयांची निराशा झाली आहे. रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या डोळ्यांतून अश्रूधारा त्यामुळे भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्डकपचाअंतिम सामना हरल्यावाहू लागल्या. क्रिकेटपटू विराट कोहलीदेखील निराश होऊन परतताना दिसला. यावेळी त्याला त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने आधार दिल्याचे दिसून आले.
भारताची विश्वविजेता होण्याची संधी हुकल्यानंतर निराश झालेल्या विराटला अनुष्का शर्मा आधार देतानाचा फोटो समोर आला आहे. यातून अनुष्का विराटचे सांत्वन न बोलता करत असल्याचेही दिसून येते. दरम्यान, भारताने आत्तापर्यंत विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात तुफान खेळी खेळली होती. मात्र, अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतरही प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूंच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे.