मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण द्या : वारीस पठाण, एमआयएम नेते

02 Nov 2023 16:07:56
 
Waris Pathan
 
 
मुंबई : मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण द्या, अशी मागणी एमआयएम नेते वारीस पठाण यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकारतर्फे शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
 
मुस्लीमांना आरक्षणाची मागणी करताना वारीस पठाण म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात आम्हाला काही हरकत नाही. पण, त्यांच्यासोबत आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे. अनेक कमिटींच्या रिपोर्टनुसार, मुस्लीमसुद्धा वंचित राहिलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिकदृष्टीने आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे, मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण शिक्षणात मिळालं पाहिजे." असं ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0