महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात ही विचित्र गोष्ट - रत्ना पाठक

उपवास वगैरे करायला मी वेडी आहे का?

    02-Nov-2023
Total Views |

Ratna Pathak


मुंबई : महाराष्ट्रातील वटसावित्रीप्रमाणेच उत्तर भारतात करवा चौथ हा सण साजरा केला जातो. यामध्ये पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राला बघून त्या आपला उपवास सोडतात. या सणाला विशेष महत्त्व असून बॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक स्त्रिया हा सण साजरा करतात.
 
मात्र, अनेक अभिनेत्रींनी या सणावर टीकादेखील केली आहे. यावेळी अनेक अभिनेत्री हा सण साजरा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सणाला अनेक अभिनेत्रींनी विरोध केला आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह यांनी या सणावर टीका केली होती.
 
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी एक किस्सा सांगितला होता. 'पहिल्यांदाच मला कोणी विचारलं की, मी करवा चौथचा उपवास ठेवतो का? मी वेडी आहे का? असे त्यांनी म्हटले होते. तसेच आजच्या आधुनिक काळातील सुशिक्षित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवतात ही खूप विचित्र गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरुन रत्ना पाठक यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.