मुंबई : नुकताच करवा चौथ हा सण पार पडला. या सणामध्ये स्त्रिया आपल्या पतीसाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राची पुजा करुन तो सोडतात. परंतू, काही बॉलीवूड अभिनेत्रींनी या सणावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते.
यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरचाही समावेश आहे. करवा चौथ सणावर प्रतिक्रिया देताना करीना कपूरने टीका केली होती. "ज्यावेळी इतर स्त्रिया उपाशी राहतील त्यावेळी मी भरपूर जेवण करेन. कारण माझे प्रेम सिद्ध करण्यासाठी मला उपाशी राहण्याची गरज नाही," असे वक्तव्य करीना कपुरने केले होते. यावरुन ती प्रचंड ट्रोल झाली होती.