लिफाफ्यात फुंकर मारुन मद्यपींची चाचणी! बिहार पोलीसांचा अजब कारभार!

02 Nov 2023 17:47:09
Doctors in East Champaran use paper cones to 'test' for alcohol consumption

पटना
: बिहारच्या रक्सौलच्या सरकारी रुग्णालयाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर मद्यपींची जुगाड वापरून तपासणी करत आहे की त्यांनी दारू प्यायली आहे की नाही. कागदावर फुंकर मारून डॉक्टरांनी ९ जणांना मद्यधुंद घोषित केले, त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे प्रकरण रक्सौल उपविभागीय रुग्णालयाशी संबंधित आहे. जिथे ११ जणांना दारू पिण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यापैकी ९ जणांनी कागदी बाटलीत मद्यपान केल्याची पुष्टी झाली. ब्रेथ अॅनालायझर हॉस्पिटलमध्ये नसल्याने हा घरगुती उपाय अवलंबण्यात आला. या 'विशेष' तपासात अडकलेल्या ९ जणांना आता तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर २ जणांना अल्कोहोलचे प्रमाण 'पुष्टी' करता येत नसल्याने सोडून देण्यात आले आहे.



 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. श्वासांच्या आधारे अल्कोहोलचे प्रमाण रक्त तपासणीद्वारे तपासले जाऊ शकते. मात्र, या रुग्णालयात यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने नमुने घेऊन ते मुझफ्फरपूरच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागले. अशा स्थितीत डॉक्टरांनी श्वासाद्वारे शोधण्याचा मार्ग शोधून काढला की, त्यांनी एक कागद गोलाकार रित्या फोल्ड करून त्याआधारे अल्कोहोलचे प्रमाण तपासले आणि त्यांना शिक्षा ही सुनावली.

या प्रकरणी रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. राजीव रंजन यांनी स्पष्ट केले की, आमच्या रुग्णालयात मद्य तपासणीची सुविधा नाही. दरम्यान, रक्सौल पोलिस स्टेशनचे प्रभारी नीरज कुमार यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनचे ब्रेथ अॅनालायझर बिघडले होते, त्यामुळे ते तपासासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.अंजनी कुमार सिंह यांनी सांगितले आहे.


Powered By Sangraha 9.0