डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त चिवरदान!

02 Nov 2023 19:24:17

Tiger group


मुंबई :
टायगर गृप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असणारे पैलवान डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पवई येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ५१ भंतेजींना म्हणजेच बौद्ध धर्मगुरुंना चिवरदान करण्यात आले. मुंबई टायगर गृपचे अध्यक्ष पै. संजयभाऊ खंडागळे यांच्यावतीने गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी ५१ भंतेजींना चिवरदान, भोजनदान, आर्थिक दान, साहित्य दान इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित ५१ भंतेजींनी डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महापरित्राण पाठ घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. तानाजीभाऊ जाधव त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.



Powered By Sangraha 9.0