मनोरंजन मिश्रा आरबीआयचे नवे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर

02 Nov 2023 14:23:42
RBI
 
मनोरंजन मिश्रा आरबीआयचे नवे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर

मुंबई: नवनिर्वाचित एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मनोरंजन मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. मिश्रा आरबीआयचे डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल इनव्हेसमेंट अँड ऑपरेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतील. यापूर्वी त्यांनी चीफ जनरल मॅनेजर म्हणून डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशन मध्ये काम केले आहे. आता ते एनफोर्समेंट डिरेक्टरेट, रिस्क मॉनिटरिंग डिपार्टमेंट, व डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल इनव्हेसमेंट अँड ऑपरेशन या विभागांचा कार्यभार स्विकारतील.
 
मनोरंजन मिश्रा यांना वित्त क्षेत्रात विशेषतः आरबीआयमध्ये तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. बँकिंग रेग्युलेशन, एनबीएफसी, बँकेचे सुपरव्हिजन, करन्सी मॅनेजमेंट या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे.
 
अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण व बँकिंग फायनान्समध्ये एमबीए व ऍस्टोन बिझनेस स्कूल लंडनमधून फायनान्स व फायनाशिअल रेग्युलेशन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे.
 
Powered By Sangraha 9.0