बसपाच्या वेबसाईटवर हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी!

19 Nov 2023 15:47:21

BSP


मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून सनातन धर्माच्या विरोधात विविध गट किंवा पक्षांकडून मोहिमा चालवल्या जात आहेत. यात राजकीय व्यासपीठावरून न्यायाच्या गप्पा मारणारे बसपासारखे पक्षसुद्धा धार्मिक द्वेष पसरवून हिंदूंमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
यातच आता मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा सनातनविरोधी चेहरा पुढे आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवरील ‘सच्ची रामायण की चाभी’ सारख्या अनेक पुस्तकांमधून पक्षाची सनातनविरोधी वृत्ती पुढे आली आहे. या पुस्तकात थेट सनातनवर टीका करण्यात आली आहे.
 
बसपाच्या 'BSPIndia.co.in' या अधिकृत वेबसाईटवर सनातनविरोधी वृत्ती समोर आली आहे. वेबसाईटवर सांगण्यात आले आहे की, १९६८ मध्येच ललाई सिंह यांनी पेरियार यांचे 'द रामायण: अ ट्रू रीडिंग' हे पुस्तक हिंदीत अनुवादित करून 'सच्ची रामायण' या नावाने प्रकाशित केले. यासोबतच 'सच्ची रामायण की चाभी' या पुस्तकाचा फोटो आणि ते पुस्तकही वेबसाईटवर उपलब्ध आहे. या पुस्तकात अनेक सनातनविरोधी गोष्टी लिहिल्या आहेत.
 
वेबसाईटवरील लिंक ओपन करताच बसपा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सनातन धर्माचा द्वेष करत असल्याचे स्पष्ट होते. यामध्ये रामायणाला कल्पना असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच भगवान विष्णू, राम, सीता, राजा दशरथ, जनक यांच्यासह अनेक पात्रांसाठी अत्यंत घृणास्पद शब्द वापरण्यात आले आहेत.



Powered By Sangraha 9.0