रोहितसेना मैदानात उतरण्याच्या आधी भारतीय हवाई दलाची गर्जना

    19-Nov-2023
Total Views |
 AIR SHOW
 
गांधीनगर : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यातच भारतीय हवाई दलाने सुद्धा रोहितसेनेच्या उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर हवाई प्रात्यक्षिक दाखवले.
 
भारतीय हवाई दलाने संपूर्ण जगाला आपल्या ताकद दाखवली. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, सर्व एकदिवसीय विश्वचषक विजेते कर्णधार सुद्धा हा सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
 
नरेंद्र मोदी आंतराष्ट्रीय स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानात १ लाख ३० हजार प्रेक्षक एकाचवेळी सामना पाहू शकतात. स्टेडियममधील बहुतांश प्रेक्षक हे भारतीय संघाचे चाहते असतील. देशभरात भारतीय संघाच्या विजयासाठी पूजापाठ चालू आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.