कुडूस-देवघर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होते वाहतूक कोंडी!

अपघात होण्याची शक्यता; विद्यार्थी जीव मुठीत घेऊन करतात प्रवास

    19-Nov-2023
Total Views |

Wada


वाडा :
तालुक्यातील कुडूस - देवघर रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कुडूस नाक्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. वाडा तालुक्यात असलेल्या गौणखनिज खाणीतून गौणखनिजाची सुसाट वाहतूक करणाऱ्या हायवा व डंपरमुळे येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. दररोज येथे छोटे-मोठे अपघात होत असून, कुडूस नाक्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण देखील वाढली आहे.
 
बुधावली, डॉगस्ते येथील डोंगरावर मुबलक प्रमाणात खडकाळ जमीन आहे. या डोंगरावर बाहेरगावांहून आलेल्या धनिकांनी मोठ्या प्रमाणांत जमीन खरेदी केल्या आहेत. डोंगरावरील जमिनीत क्रशर मशीन बसवून हजारो टन दगड काढून रेती, खडी, कच असे खनिज मुंबई, ठाणे, वसई अशा शहराच्या ठिकाणी विक्रीस पाठविले जाते.
 
कुडूस व चिंचघर गावालगत ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर व नॅशनल इंग्लिश स्कूल अशा मोठ्या शैक्षणिक संस्था असून येथे दररोज हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या रस्त्यावर आपला जीव मुठीत घेऊन विद्यार्थी रोजचा प्रवास करीत आहेत.
 
येथे सततच्या होणा-या वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जाणारी ही वाहने दिवस-रात्री-भरधाव बेगाने कुडूस-चिंचघर रस्त्यावर धावत असून अशा मोटर वाहन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.