पुणेकरांनो पाणी जपून वापरा, २१ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

18 Nov 2023 16:28:36
pune city water supply closed

पुणे :
पुणे शहरातील नागरिकांना येत्या २१ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद असल्याकारणाने पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवार २२ नोव्हेंबर रोजी या परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

दरम्यान, वारजे जलशुध्दीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील नागरिकांना या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोथरूड, पौंड रस्ता, औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी, कोंढवे-धावडे, शिवणे या परिसरातील एका दिवसासाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे जलशुध्दीकरणे केंद्रांतर्गत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामांमुळे शहरातील काही भागात पाणीपुऱवठा एक दिवस खंडित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0