'श्रीमान रायगड'ची मुंबईत अनोखी सफर!

    18-Nov-2023
Total Views |
model of Raigad fort

मुंबई
: दिवाळीत सर्वत्र बच्चे कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करत असतात. अशातच आता चिंतामणी क्रीडा मंडळामार्फत ३५० व्या शिवराज्याभिषेक निमित्त ३८ फूट रुंद लांबीची स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्याची भव्य -दिव्य अशी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

मातीपासून तयार केलेल्या या रायगड किल्याच्या प्रतिकृतीला तयार करण्यासाठी जवळपास १५ दिवस लागले. तरी मंडळातील तरुणांनी त्याची धूरा आपल्या खांद्यावर पेलली. तसेच मंडळातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य प्रतिकृती तयार झाली असून दि.२५ नोव्हेंबर पर्यत तुम्ही चिंतामणी सोसायटी, संभाजी महाराज नगर, सहार रोड, अंधेरी ( पु ) येथे जाऊन ती प्रतिकृती पाहू शकता. तसेच तिथल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शानाखाली रायगडाची चौफेर माहिती ही नागरिकांना मिळवता येणार आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.