गाफील राहू नका, लोकसभेच्या तयारीला लागा: उद्धव ठाकरे
18-Nov-2023
Total Views | 31
मुंबई : नेत्यांनो, गाफील राहू नका, लोकसभेच्या तयारीला लागा अशा सूचना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी बैठक घेतली. महाविकास आघाडीतील जागा वाटपात कोकणातील दोन्ही जागा या उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या नंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत सर्व नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
ही बैठक जवळपास दोन तास सुरू होती. यात ठाकरे यांनी आजपासूनच निवडणुीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.