डेव्हिड बेकहम 'मन्नत'वर, शाहरुख खानने केलं विशेष कौतुक

    18-Nov-2023
Total Views |

shah rukh khan
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध फुटबॉलस्टार डेव्हिड बेकहम सध्या एकदिवसीय विश्वचषक सामने पाहण्यासाठी भारतात आला आहे. डेव्हिड भारत विरुद्ध न्युझीलंड हा उपांत्य फेरीचा सामना पाहायला वानखेडेवरही उपस्थित होता. भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या डेव्हिडचे कौतुक कलाकारांकडून केसे जात आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने डेव्हिडला खास मन्नतवर येण्याचे आमंत्रण देखील दिले होते.
  
शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर गेल्यानंतर शाहरुखने फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमच्या दयाळू स्वभावाचे कौतुक केले. शिवाय, शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन लिहीलंय की, "काल रात्री एका आयकॉन आणि एका परिपूर्ण व्यक्तीची भेट झाली. मी नेहमीच त्याचा खूप मोठा चाहता होतो”.
 
 
 
शाहरुख पुढे असे देखील म्हणाला की, “डेव्हिड बेकहमला भेटून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं ते म्हणजे तो मुलांसोबत कसा वागतो. हे पाहून मला जाणवलं की, फुटबॉलपेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे डेव्हिडचा दयाळूपणा आणि सौम्य स्वभाव. तू आणि तुझ्या कुटुंबावर माझे खुप प्रेम. असाच चांगला आणि आनंदी राहा माझ्या मित्रा. आणि थोडा आराम करा...''. दरम्यान,  अभिनेत्री सोनम कपूरने देखील डेव्हिडसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कलाकार मंडळींनी या पार्टीत हजेरी लावली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.