नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या लस निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काय म्हणाले डॉक्टर?
रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांची प्रकृती आता बरी होत आहे. रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी सांगितले की, डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शुक्रवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. परवेझ ग्रांट, डॉ. मॅकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली डॉ. पूनावाला यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.