जावेद मियांदादचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; म्हणाले- 'अयोध्येतील राम मंदिरात जो जाईल तो मुस्लिम...'

18 Nov 2023 11:49:55
Former Pakistan cricketer Javed Miandad comments on Ram Temple

नवी दिल्ली
: क्रिकेट विश्वचषक सुरु झाल्यापासून पाकिस्तानचे सध्याचे क्रिकेटपटू किंवा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वादग्रस्त विधान करत आहेत. त्यांचा भारत आणि हिंदूंबद्दलचा द्वेषला ही ते वाट मोकळी करून देत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, जो कोणी अयोध्येतील राम मंदिरात जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल.

व्हिडिओमध्ये मियांदादला असे म्हणताना ऐकू येते की, “भारतात जे काही घडत आहे आणि ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उत्तम काम केले आहे. जे त्यांच्यासाठी चांगले आहे, आमच्यासाठी नाही. मी खोलात जाऊन सांगेन. त्यांनी मशिदीच्या जागेवर मंदिर उभे केले. पण इंशाअल्लाह, माझा विश्वास आहे की जो कोणी त्या मंदिरात जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल. कारण आमची मूळे नेहमी तिथे असतात.त्यामुळे तुम्ही काहीतरी चूक केली याचा मला खूप आनंद वाटतो, पण लोकांना समजणार नाही. इंशाअल्लाह, मुस्लिम तिथून बाहेर येतील.

व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप आठ मिनिटांच्या व्हिडिओचा भाग आहे जो सुमारे तीन वर्षे जुना आहे. मियांदादने ८ ऑगस्ट २०२० रोजी हा व्हिडिओ जारी केला. याच्या तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन केले होते. तुम्ही खाली मियांदादचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, अयोध्येत १६ जानेवारी २०२४ पासून राम मंदिराच्या अनुष्ठानाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

मियांदादचा राम मंदिराप्रती असलेला द्वेष पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची टर उडवली जात आहे. एका यूजरने लिहिले आहे की, हे ऐकून खूप मजा येते. माझा भाचाही लहानपणी असेच तोतरे बोलायचा. तसेच मथुरा आणि काशीचा उल्लेख करून एकाने लिहले की, तोतऱ्याचा आनंद आणखी वाढला.



Powered By Sangraha 9.0