मुंबई : मुंबईला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. ब्रिटिशपूर्व काही स्त्रहले व ब्रिटिश कालीन प्रेक्षणीय स्थळ मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणीही उत्तम अवस्थेत आहेत. मुंबईत स्थायिक सलेल्या नागरिकांना या समृद्ध परंपरेविषयी माहिती मिळवी म्हणून भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आयोजित गिरगांव वारसा सफर ( हेरिटेज वॉक ) चे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २६/११/२०२३ दुपारी ३ ते संध्याकाळी ७.३० या वेळेत हि अभ्यास सफर आयोजित केली आहे. ग्रँटरोड पश्चिम येथील नाना चौक बंबखान्यासमोरील नाना शंकरशेठ यांच्या अर्धपुतळ्याजवळ एकत्र होऊन गांवदेवी - केनेडी पूल - साकेत संघ कार्यालय - दोन हत्ती - मारवाडी विद्यालय - गिरगांव रोड - स्वामी समर्थ मठ कांदेवाडी या मार्गाने गोरा राम, काळा राम मंदिर, ठाकूरद्वार पर्यंत अनेक ऐतिहासिक वास्तू पहात, त्यांच्याशी संबंधित इतिहास समजून घेत पदभ्रमण या सफरीत आयोजित कारण्यातले आहे. या सफरीसाठी कोणतेही शुल्क नाही. तरी सर्व इकचुकानी नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे.
सहभागी होणाऱ्यांनी तीन ते चार तास पायपीट करण्याची तयारी ठेवावी. तसेच उन्हासाठी टोपी, पाण्याची बाटली आणि खाण्यासाठी चाव - म्याव स्वतः चे स्वतः आणावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणी करण्यासाठी संपर्क -
मल्हार गोखले
7208555458
दिलीप भोमकर
9323575163
कृपया आपले नाव वरील दोन क्रमांकांवर व्हॉट्स ॲप द्वारेच नोंदवावे...