रश्मिका मंदाना नंतर अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ झाला व्हायरल

17 Nov 2023 18:21:36

kajol 
 
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बळी आणखी एक अभिनेत्री ठरली आहे. ही अभिनेत्री आहे काजोल. काजोलचा चेहरा लावून कपडे बदलण्याची ही व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
 

kajol 
 
दरम्यान, हा डीपफेकचा मूळ व्हिडीओ आधीच ‘टीकटॉक’वर उपलब्ध असल्यामुळे याची शहानिशा करणे सोप्पे झाले असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप या मूळ व्हिडीओतील सोशल मीडिया क्रिएटरची ओळख पटली नसली तरी ‘क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार हा मूळ व्हिडीओ रोजी ब्रीन या सोशल मीडिया क्रिएटरचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या डीपफेक व्हिडिओची झळ केवळ रश्मिका आणि काजोलच नव्हे तर सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांनाही बसली आहे.
Powered By Sangraha 9.0