भोपाल : मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी रतलाममधील काँग्रेस उमेदवार पारस सकलेचा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये पारस सकलेचा म्हाताऱ्या व्यक्तिसमोर चप्पल घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. तर म्हातारा त्यांना त्याचं चप्पलेने मारताना दिसतो. पारस हे तोच काँग्रेस नेता आहे.ज्याने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 'डायन' म्हटले होते.
व्हिडीओमध्ये दिसणारे म्हातारी व्यक्ति पारस सकले यांच्या कधी पाठीवर, कधी खांद्यावर तर कधी चेहऱ्यावर चापट मारतो. आणि एकदा मारल्यावर ते थांबत देखील नाहीत. दरम्यान मागून कोणीतरी म्हणतो, बाबा, पुरे झाले, पण म्हातारी व्यक्ति काही केल्या थांबत नाही. यावेळी काँग्रेस नेते हसत हसत त्यांच्या पायाला स्पर्श करत राहतात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी काँग्रेस नेत्याची खिल्ली उडवली आहे. कोणी चप्पल घालण्याच्या लायकीची कॉंग्रेसच आहे,असे म्हणत आहे. तर कोणी बाबांनी आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही असे चिमटे काढत आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याला चापट लगावणारी व्यक्ति कमल रझा नावाचा फकीर आहे. तो महू नीमच रोडवर फिरतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना चप्पल मारून आशीर्वाद देतो. बरेच लोक त्यांच्या तक्रारींसह नवीन चप्पल आणतात जेणेकरून कमल रझा त्यांना मारहाण करून आशीर्वाद देऊ शकतील.