अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक

17 Nov 2023 18:53:36

tejashrei pradhan
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सुन मी या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. तेजश्रीची आई सीमा प्रधान याचे गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतल्याची माहिची मिळत आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या असे देखील समोर येत असून आजारपणाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.तेजश्रीने अद्याप याबाबत कोणतीही पोस्ट केलेली नाही.
 
दरम्यान, तेजश्री आणि तिच्या आईचं नातं खूप छान होतं. तेजश्री सध्या 'तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे. यापूर्वी तिने होणार 'सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन' यांसारख्या चित्रपटातही ती झळकली होती. 
Powered By Sangraha 9.0