गावागावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू : समीर भुजबळ

17 Nov 2023 14:53:24
NCP Mumbai President Samir Bhujbal

मुंबई :
राज्यात अभूतपूर्व स्थितीत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावागावात जातीय तेढ निर्माण करुन विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मग तो कुठलाही समाज असो, तसे करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांचे बंधु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर राज्यातील सुरू असलेल्या गावातील प्रवेशबंदीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. "ज्या नेत्यांनी इतका काळ गावासाठी आपली सेवा दिली, त्यांना अशाप्रकारे गावाच्या वेशीवर रोखणं हे चुकीचं आहे," असेही भुजबळ म्हणाले.
Powered By Sangraha 9.0