मुंबई : कालचा राडा हा ठरवूनच केला होता, असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हें. ला ११वा स्मृतिदिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. मुख्यमंत्री तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला.
दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सर्वात पहिले कुणी घोषणाबाजी केली, राडा कुणी केला, हे तपासुन घ्यावे. कालचा राडा हा ठरवूनच केला होता." असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.