प्रस्थापितांना देऊ उत्तर, ओबीसी शंभरात सत्तर! पडळकरांचं भाषण गाजलं

    17-Nov-2023
Total Views |
 
Gopichand Padalkar
 
 
मुंबई : ओबीसींवर अन्याय झाला तर महाराष्ट्र पेटून उठेल. असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. जालन्यातील अंब़डमध्ये ओबासींची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार ही उपस्थित होते. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण आहेत? याचे उत्तर जनतेतून घेतले. जनतेने शरद पवार यांचे नाव घेत उत्तर दिले.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले, "महाराष्ट्रात ३८ भटक्या जाती ओबीसीतल्या आहेत. माळी, धनगर, वंजारी समाजाने या भटक्या लोकांना सोबत घ्यावे. आपण ओबीसी संघटना बांधावी आणि न्याय द्यावा. अनेक जातीत विभागलेले वाघाचे बछडे एकत्र आलेत. महाराष्ट्रातील ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणजे भुजबळ साहेब आहेत. त्यांनी भटक्या जमातींना ऊर्जा देण्याचं काम केलं. वाघ म्हातारा झाला म्हणजे तो डरकाळी फोडायचा राहत नाही. सिंह म्हातारा झाल्यावर गवत खात नाही."
 
"ओबीसी आरक्षणाला धक्का लागता नये. काहींकडून ओबीसींची वाटमारी सुरू आहे. ओबीसींची ही सभा पाहून ओबीसीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसीमधील ३४६ जातींचे आरक्षणाला हात लावता काम नये." असं पडळकर म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.