मुंबई : आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जात आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य सेवा महासंचालनालयातील ६४ पदांवरील तब्बल ४८७ जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आरोग्य सेवा महासंचालनालया अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी दि. ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आली असून या तारखेपूर्वी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, दहावी / बारावी / आयटीआय / पदवी पदानुसार संबंधित क्षेत्रातील डिप्लोमाधाररकांना या भरतीच्या माध्यमातून चांगली संधी निर्माण झाली आहे.