नवी दिल्ली : यंदाचा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवर जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या विश्वचषक अंतिम सामन्याआधी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघाचा एक विशेष एअर शो होणार आहे. तसेच, विश्वचषकाचा अंतिम सामना भव्य बनवण्यासाठी भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघ अंतिम सामन्यापूर्वी एक विशेष एअर शो सादर करण्यात येणार असून त्याच्या तालीमची झलक आयसीसीने त्यांच्या WhatsApp चॅनलवर शेअर केली आहे.