ई-रिक्क्षातून फिरवण्याच्या बहाण्याने 'ती' ठरली शावेझच्या वासनेची शिकार!

    17-Nov-2023
Total Views |
5 year old girl raped by e rickshaw driver Chavez

रांची : उत्तराखंडमध्ये एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शावेज हा ई-रिक्षा चालवतो. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

ही घटना उधम सिंह नगर जिल्ह्यातील किच्छा तालुक्यात घडली. पुलभट्टा पोलीस शावेजचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही फरार आहेत. ही घटना दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोज सायंकाळी घडली.पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, ती मजुरी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान, आरोपीने तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्या ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.
 
मुलीसोबत असे घृणास्पद कृत्य झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१४ नोव्हेंबर २०२३) संध्याकाळी एका मुलीला घराबाहेर खेळताना पाहून उत्तर प्रदेश -उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या गावात ई-रिक्षा चालवणाऱ्या शावेझचे मनसुबे बिघडले. त्याने या ५ वर्षाच्या मुलीला ई-रिक्षात नेण्याचे आमिष दाखवले.
 
मुलीला घेऊन काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी शावेजने उसाच्या शेताजवळ रिक्षा थांबवली. यानंतर त्याने मुलीला हाताने ओढून शेतात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीचा रडण्याचा आवाज गावकऱ्यांनी ऐकताच शावेजने ई-रिक्षा जागेवरच सोडून फरार झाला.
 
या प्रकरणाची माहिती मिळताच पुलभट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश भट्ट पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीची ई-रिक्षा जप्त केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलगी खूप घाबरली असल्याचे आईने सांगितले आहे.त्याच्या शोधात पोलीस आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत. त्याला लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलीस क्षेत्र अधिकारी ओमप्रकाश शर्मा यांनी दिले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.