मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित कायमच चर्चेत असते. सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर तेजस्वीनी पंडित व्यक्त होताना दिसत आहे. राजकारणच नाही तर समाजातील अनेक मुद्द्यांवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. नुकतीच तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा मराठी माणूस असला पाहिजे," असे म्हटले आहे.
तेजस्वीनी पंडितने शएअर केलेल्या या व्हिडिओत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, "मराठी माणसामध्ये आपल्या घरातील मुलाला बेटा रिस्क घेऊ नको...धोका घेऊ नको. आपली नोकरी कर, महिन्याला पैसे डिपोजिट कर, इन्शुरंस काढ...इन्स्टॉलमेंटवर गाडी घे...इन्स्टॉलमेंटवर घर घे आणि सुखी संसार कर...हेच आपण आपल्या मुलांना शिकवतो, हे बंद करा. नोकरी मागणारे नाही मागणारे नाही नोकरी देणारा मराठी माणूस झाला पाहिजे." तेजस्विनीच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.