“माझ्या आईला पार्टनरची गरज असणं हे”, सिद्धार्थने सांगितले 'त्या' निर्णयामागचे खरे कारण

16 Nov 2023 17:10:47

siddharth chandekar 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. आता आई किंवा वडिलांचे दुसरे लग्न लावून देणे यात कसला आदर्श असे ताशेरे नक्कीच ओढले जातील. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यात साथीदार सोबत हवा असे वाटणे काही गैर नाही, आणि तिच बाब ओळखून सिद्धार्थ आणि मिताली यांनी सीमा चांदेकर यांचे लग्न लावले. आपल्या आईचे दुसरे लग्न का लावले? याचं कारण सिद्धार्थ चांदेकरने महाएमटीबीशी बोलताना सांगितले. २४ नोव्हेंबर रोजी 'झिम्मा २' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान संवाद साधताना सिद्धार्थ त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाला. यावेळी तो म्हणाला की, “माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नसून तर ती माझी आणि माझ्या आईची गरज होती”.
 
पाल्यांनाच त्यांच्या आई-वडिलांचे खरे डोळे समजतात
 
माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मॉर्डनायझेशन नाही आहे. तर ती माझी आणि माझ्या आईची गरज आहे. ट्रोलिंगकडे मी फारसं गंभीरपणे पाहिलं नाही कारण माझ्या आईचं जीवन ती लोकं तर माझी आईच तीचं आयुष्य जगत आहे. आणि मी पाहिलं आहे तिने तिचा एकटेपमा कसा सहन केला, त्या एकटेपणातही तिने माझा सांभाळ कसा केला, मला कसं मोठं केलं आहे. महत्वाचं म्हणजे, मला माझं लग्न झाल्यानंतर समजलं की, जोडीदार सोबत असला की आपल्या जीवनात एक स्थैर्य येते. आणि संवाद साधणारी व्यक्ती जर का सोबत असेल तर त्याचा आपल्या जीवनात किती आणि कसा फरक पडतो हे मला माझ्या लग्नानंतर अधिक जाणवलं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, पोरांनाच त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील सुख आणि दु:ख दिसून येतं, केवळ त्यांनाच ते खरे डोळे दिसतात आणि समजतात. आणि तेच हेरुन मी तिला तिला देखील तिचे पुढचे आयुष्य सुखात घालवण्याचा अधिकार आहे हे जाणवून दिलं आणि पुढचा प्रवास घडला”.
 
दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोबत सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे अशा ७ अभिनेत्री दिसणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0